About us (तज्ञांबाबत अधिक माहिती)

प्रसिद्ध टिव्ही स्टार व अनुभवी तज्ञ
प्रा राजवर्धन लोंढे
संमोहन उपचार तज्ञ
– ७०००+ यशस्वी उपचार
– Zee 24 taas tv ने घेतली दखल
– प्रसिद्ध लेखक: ‘संमोहन उपचार – एक नैसर्गिक वरदान’, ‘कामजीवनातील योद्धा बना’, ‘अंतरंग मनाचे’
– संस्थापक: ग्लोबल हिप्नोथेरपी असोसिएशन
– संशोधन कर्ते: Student Intellectual Development Research 2024-25
विस्तृत:
अनुभवी संमोहन तज्ञ प्रा राजवर्धन लोंढे संमोहनशास्त्रावर गेली १२ वर्ष प्रात्यक्षिकांसह अभ्यास करीत आहेत. आजपर्यंत त्यांच्या शेकडो स्टेज शो चा लाखो प्रेक्षकांनी आनंद लुटला. संमोहनशास्त्र वैज्ञानिक व वैद्यकीय दृष्ट्या समजून घेतले. प्रा राजवर्धन लोंढे सरांचे वैयक्तिक संमोहन उपचार व तसेच ग्रुप उपचार कार्यशाळा पुण्यात नेहमीच होत असतात, तसंच मागणीनुसार मार्केटिंग क्षेत्रात, कंपन्यांमध्ये, कोचिंग क्लासेससाठी सुद्धा त्या-त्या ठिकाणी कार्यशाळांचं आयोजन केलं जातं. तसेच प्रा राजवर्धन लोंढे सर हे ‘ग्लोबल हिप्नोथेरपी असोसिएशन’ संस्थापक आहेत. प्रसिद्ध लेखक, हजारों लोकांवर उपचारांचा अनुभव, संमोहन उपचार कार्यशाळेत खालीलप्रमाणे फायदे होतात.
भीती, काळजी, चिंता, टेन्शन, दडपण, धडधड, निराशा, उदासीनता, निद्रानाश, नकारात्मक विचारसरणी, न्यूनगंड, तोतरेपणा….. तसेच डोकेदुखी, चकर येणं, फिट येणं, अकाली केस पांढरे होणं/गळणं. कानांमधून आवाज येणं, भास-भ्रम कायम सदी, कायम खोकला, दमा, थायरॉईड, अटॅक, मधुमेह, अपचन, ॲसिडिटी, गॅसेस, डेकर, मळमळ, उलट्या, रक्तदाब, वैवाहिक समस्या, अंगदुखी, सांधेदुखी, स्नायुदुखी, अंगाला मुंग्या येणं, तळपायांची आग आग होणं…. बासारख्या वर्षानुवर्ष औषध गोळ्यांना दाद न देणान्या मानसिक-शारीरिक आजारांवर इलाज दारू, पान, सिगारेट, बिडी, गुटखा, गर्द, चरस……. यांसारख्या व्यसनांपासून कायमची सुटका. विद्यार्थ्यांसाठी चुकीची मैत्री. चुकीच्या सवयी सोडवून एकाग्रता, स्मरणशक्ती, आकलनशक्ती व आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रा राजवर्धन लोंढे सरांचे संमोहन उपचार मोलाचे कार्य करतात. संमोहन उपचारांच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांची गर्दी वाढत आहे. विद्यार्थ्यांसाठी आता स्वतंत्र कार्यशाळा आयोजित केल्या जातात. कला क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती अधिक निपुण बनतात. आजपर्यंत ५ हजारांपेक्षा जास्त गरजूंनी त्यांच्या संमोहन उपचारांचा लाभ घेतला. त्यात नाशिक, पुणे, मुंबई, कोल्हापूर येथील मोठमोठ्या नामवंत डॉक्टरांचासुद्धा समावेश आहे. पोलिस अधिकारी, न्यायाधीश, आमदार-खासदार, मंत्री महोदय यांसारख्या नामवंत व्यक्तीसुद्धा त्यांच्या कार्यशाळेचा लाभ घेत असतात; तसंच अमेरिका, दुबई, जर्मनी, जपान यांसारख्या देशातून सुद्धा पेशंट्स उपचारासाठी येत आहेत.
वेळोवेळी ठिकठिकाणी त्यांची वरील संदर्भात व्याख्यानं व प्रात्यक्षिकं आयोजित केली जातात. ‘द सिक्रेट ऑफ सक्सेस’ हा संमोहनशास्त्रावर आधारित मनोरंजनात्मक, बैज्ञानिक व आश्चर्यकारक प्रयोग बघण्यासाठी प्रेक्षकांची नेहमीच गर्दी होत असते.